Marathi poem on the status of jungle, written by me 🙏🙏
होतं एक आटपाट जंगल, खुप तिथे प्राणी..
प्राण्यांची लागली शर्यत, झाली मोठी गंमत !
वाघ झाला राजा, मागे त्याच्या वझीर
वझीर होता खंबीर, मात्र हातात त्याच्या खंजीर !
वाघ लागला भिऊ, झाला जणु मनिमाऊ..
करू लागला म्यॅवम्यॅव, झाली नुसती ट्यॅंवट्यॅंव !
आली एकदा रोगराई, वाघाला काही सुचे नाही..
वझीर म्हटला माझ्याकडे बघ, तोंड ठेव एकदम गप !
जंगलात होता एक सिंह, वाघ झाला पुर्ण ढिम्म..
वझीराला सुचली एक युक्ती, शोधून काढली नवी क्लृप्ति !
सल्ला त्याचा वाघाला, कर सिंहाची नक्कल..
सिंहांचं कुठलेही सत्कर्म, म्हण ही तर माझीच शक्कल !
सारखा दिसु लागला वाघ, वाटलं त्याला आता आपलाच राज..
प्रजा होती मोठी हुषार, त्यांना दिसला नुसताच साज !
प्रजेने पारखलं वाघाला, सलाम त्याचा वझीराला..
वाघ म्हण की मनीमाऊ, आहे नुसताच दिखाऊ !
एकदा तरी वाघासारखं वाग, मनीमाऊचं रूप त्याग..
वाघ-सिंहासारखी जोडी नाही, वझीर तर आमच्या ध्यानीमनीपण नाही !
आटपाट जंगल कंटाळल, गपचुप घरीचं बसलं..
वाट बघुं लागलं अच्छे दिनची, म्हटलं कुणीतरी पुन्हा येईल !
-जयवंत
Image Courtesy: Wild Trails
Disclaimer: This is a story of a beautiful jungle and any resemblance to any human is purely coincidental and unintentional .
No comments:
Post a Comment