टपरीवरचा चहा नाही
अचानक दिसलेला वडा-पाव नाही..
सलोनचा हेड-मसाज नाही
दाढीनंतरचा स्प्रिंकलर नाही..
बारमधे मित्र नाही
शाॅपिंग माॅलचा टाईमपास नाही..
होम डिलीव्हरी म्हणजे रेस्टाॅरंट नाही
नेटफ्लिक्स म्हणजे थिएटर नाही..
ऑफिसची धमाल नाही
सुटी घेतल्याची मजा नाही..
दिल्लीतले पिताश्री, मुंबईतल्या मातोश्री
एकाची धडपड, दुसरीकडे पडझड बघवत नाही..
टिव्हीवर बातमी नाही
कंगना की कोरोना समजत नाही..
कोरोनाचं काही खर नाही
तो तुमचा आमचा कुणाचा नाही..
विश्वासावर जग आहे
सामान्य माणूस सजग आहे
सायंटिस्ट्सची साथ आहे
आज नाही तर उद्या कोरोनावर मात आहे..
-जयवंत
No comments:
Post a Comment