Wednesday 21 April 2021

शिक्षण की शिक्षणाचा धंदा !


अखेर ठरलं आणि 1 अब्ज डॉलर्स (₹ 7,300 कोटी) चा सौदा पक्का झाला. अबब! रक्कम बघुन  कुठलीतरी बहुराष्ट्रीय कंपनी विकली किंवा विकत घेतली असावी असा समज (गैर) होतो पण हा तर चक्क Byju’s ने Aakash Educational Services ताब्यात घेतल्याचा व्यवहार होता. 😳😳

गरिबांसाठी, गरजुंसाठी, योग्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही संकल्पना हे सगळे ऐकल्यावर कल्पनेपलीकडचेच  नाही तर भयावह सुद्धा वाटते.

मला आठवतयं, आणि ही काही कोणे एके काळची गोष्ट नाही, गणिताचा क्लास  ₹ 20 / महिना, १२ वी ₹800 / विषय आणि पैसे देताना शिक्षक आवर्जुन सांगत,” कळत असेल आणि आवडत असेल तरच पैसे दे. उगीच आई बापाचे पैसे खर्च करु नकोस”  आता तर executive चा कॉल येतो आणि educational benefits समजावून सांगीतले जातात.

सर्वांसाठी सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास, जागोजागी फोफावलेल्या शिक्षण सम्राटांच्या हातात कधी  गेला ते कळलेच नाही. विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांपेक्षा अभियांत्रिकी महाविद्यालये जास्त, वैद्यकीय शिक्षण म्हणजे १० वर्षाचा खडतर (कमी पगारातला) प्रवास आणि मग कुणी कुठलेही शिक्षण घ्या आणि IT मध्ये जा. सगळेच अनाकलनीय  🙏

शिक्षण व्यवसायात इतका पैसा की, Byju’s BCCI चा ₹ 1200 कोटी देउन प्रायोजक होतो, Unacademy IPL पार्टनर होते आणि आई वडीलांचा मुलांना “ ब्रेक तो ले ले पार्टनर”  सांगतानाचा आनंद ओसंडुन वाहत जातो.

Benson & Hedges ही  cigarette कंपनी ऑस्ट्रेलियात क्रिकेट sponsor  करायची पण अखेर कंपनीचे प्रायोजकत्व बाद करण्यात आले कारण  जनतेकडून आलेला व्यसनातला पैसा क्रिकेट वर ओतुन कंपनी goodwill कमवत होती. ऑनलाईन शिक्षण सुद्धा आपल्या खिशातला पैसा काढून क्रिकेटचा असाच उपयोग करत आहे.

Online education, demonstrated practicals, 24*7 शिक्षण, आणि हवा तेव्हा अभ्यास ही काळाची गरज आहे पण म्हणुन ₹ 7300कोटी? अशामुळे , एक नाविन्यपुर्ण कल्पना business model मधे भरकटत जाणार हे नक्की 

शिक्षण आई वडिलांच्या कमाईच्या स्त्रोतावर, exposure वर अवलंबुन असुच शकत नाही तर विद्यार्थ्याच्या  बौधीक पातळींवर  अवलंबुन असायला हवे. आधी शिक्षणसम्राट तयार झाले आता ऑनलाइन व्यावसायिक तयार होणारं आणि आपल्यासारखे गरजवंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी या जाळ्यात गुंतत जाणार 😔 

काळ बदलला, वेळ बदलली, शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी बदलले , Global exposure च्या नावाखाली आता पालक पण बदलतोय. चुक की बरोबर हे भविष्यात दडलयं. तोपर्यंत आपण या takeover ची तारीफ करुया आणि नवीन Business Model ची वाट बघूया 😊

टीपः वरील विचार ऑनलाइन/ ऑफलाइन शिक्षणाच्या विरोधात नाही पण त्यातल्या व्यवसायाच्या आणि गुंतलेला पैसा यावर वैयक्तिक मत आहे.

Image Courtesy: Times of India


No comments:

Post a Comment

Take a bow Japan for Tokyo Olympics and way forward for India

As the glittering ceremony of the Tokyo Olympics 2021 came to an emotional end, one can’t move ahead to Paris 2024 before bowing to Japan an...