Sunday, 20 June 2021

माझे बाबा आणि Happy Father’s Day !

 

लहानपणी कधीही अस्तित्वात नसलेला Father’s Day आज मार्केटिंगच्या युगात मात्र न चूकता माध्यमातून मनावर बिंबविला जातो. आपल्यालासुद्घा काळानुसार बदल स्विकारावाच लागणार कारण अस म्हणतात ना, Change is Constant आणि बाप म्हणुन तर स्वत:ला बदलणं खुप महत्वाचं.

म्हणुन मग म्हटलं अशा खुप व्यक्त, अव्यक्त भावना आपल्या मनांतसुद्धा आहेत मग Father’s Day च्या निमित्ताने आपण पण मनोगत व्यक्त करावे.

सगळ्यांनाच आपला बाप हा जगातील सर्वोत्कृष्ठ बाप वाटतो तसा मलाही वाटायचा, अजुनही वाटतो. डॅडी, डॅड, पॅाप, पप्पा या विशेषणापलीकडचे म्हणजे माझे ‘उत्तम बाबा’.

असं म्हणतात, मुलगा १५ वर्षांचा झाला की वडिल मुलाचे मित्र होतात पण आमच्यासाठी (मी आणि माझा भाऊ डॉ उदय)मात्र बाबा लहनपणीपासुनच घट्ट मित्र. बाबांची भीती किंवा धाक खर तर कधी वाटलाच नाही. लहान असतांना वडिलांच्या खांद्यावर हात ठेवायचे जे freedom होते ती मजा काही औरच.

परीक्षेत कमी मार्क्स मिळाले की पुढच्या परीक्षेत नक्की चांगले मिळतील हा विश्वास ठेवत सही करणारे बाबा 😊 असोत की मला पहिली नोकरी मिळाल्याचा आनंद असो, सगळ्यात आधी कुणाला हे कळणार म्हणजे बाबा. हं, आता मी 10 jobs बदलले तरी माझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करणारे ते बाबा.

कुठलेही वर्ग असोत वा उन्हाळी शिबिरे, स्वत:ला कितीही कष्ट झालेत तरीही न चुकतां वर्ग सुटायच्या आत बाहेर उभे असणारच याची खात्री असणारे बाबा.

MBBS ची ॲडमिशन न घेणारे बाबा, IAS First attempt मध्ये पास होणारे बाबा, Bank Of Maharashtra मध्ये उच्च पद न स्विकारणारे बाबा आणि पुस्तकांसोबत रममाण होण्यासाठी निवडलेली नोकरी म्हणजेच बाबा.कदाचित म्हणूनच Doctor, Engineer होण्याचे स्वातंत्र्य आम्हा भावंडांचे आणि कुठलाही निर्णय न लादणारे आमचे बाबा.

नोकरी निमित्त सरकार कडुन बाबांना मिळालेला बंगला आणि  बाजुला असलेले मोठे मैदान म्हणजे माझ्यातल्या क्रिकेटवेड्यासाठी  पर्वणी. बरोबरची असलेली सगळी मुलं spinners म्हणून मग मला Fast Bowling चा सराव असावा म्हणुन Outswing आणि Inswing टाकणारे माझे बाबा.

आई शाळेत शिक्षिका, त्यामुळे प्रत्येक शनिवारी घरी बाबा, मी आणि दादा. मग नुकतीच लॉन्च झालेली Maggie 2 minute noodles उत्साहाने बनविणारे ते बाबा.

कुठलेही प्राणिसंग्रहालय, बगीचा असो वा Long Drive असो, आम्हा दोघा भावंडांना न चूकता फिरायला घेऊन जाणारे बाबा.

वयाच्या 13 व्या वर्षी जी डायरी लिहिण्याची सरुवात केली ती अजुनही अखंडित ठेवणारे बाबा. मग, नातेवाइक असोत, सहकारी किंवा शेजारी, कुणाचा कुठलाही milestone असो, तो न विसरतां नोंद करुन ठेवणारे काका म्हणजे आमचे बाबा.

जागतिकी इतिहास किंवा भूगोल.इसविसन पुर्व असो की नंतर, encyclopaedia, Wikipedia पेक्षा मजबुत स्त्रोत बाबा. 

Time, Sportstar, Illustrated Weekly, धर्मयुग, Filmfare किंवा माधुरी, दिवाळी अंक, प्रत्येकाच्या आवडीनुसार आणुन देणारे आणि आमची वाचनाची आवड जपणारे बाबा.

आईला लग्नानंतर सुद्धा डबल ग्रॅज्युएशन करण्यासाठी प्रोत्साहन देणारे बाबा. मग आईच्या परीक्षेत किचन मधे बाबा दिसले नसते तर नवलचं 

नोकरी निमित्त आमची गावं, देश बदलले पण  मनात कुठलाही प्रश्न नाही. आमच्या बरोबर स्वत:चे पण निवासस्थान चुटकीसरशी बदलणारे आणि नव्या गावावर तितकेच प्रेम करणारे बाबा.नातवंडांसोबत स्वत:ला रमवुन घेणारे आजोबा.

बाबांइतकीच आईची तपश्चर्या तितकीच मोठी, प्रत्येक संकटात बाबांसोबत उभी राहणारी आमची आई पण आज Father’s Day म्हणुन मग आईविषयी नंतर कधीतरी. 

Father’s Day ही काही आपली संस्क्रीती नाही पण नवे ते accept करायला शिकविणारे बाबा म्हणूनच या दिवशी बाबांसाठी प्रेम आणि त्यांचा मिळालेला आधार याविषयी व्यक्त केलेले हे आभार 🙏🙏🙏

Image Courtesy: iStock

Take a bow Japan for Tokyo Olympics and way forward for India

As the glittering ceremony of the Tokyo Olympics 2021 came to an emotional end, one can’t move ahead to Paris 2024 before bowing to Japan an...