राजघराण्याची रीतच न्यारी ..
एक होती राणी, दिमाख तिचा मोठा
होती पगारी पण तिचे असंख्य दरबारी..
साम्राज्य गेलं, सत्ता गेली
जुनी पुण्याई धावुन आली, राणीला तारुन नेली..
काळ बदलाला जग बदललं
राजपुत्राचं मन घुसमटल..
राणी सत्ता सोडेना, राजपुत्र राजा होइना
राजगादीवर आले सहा वारसदार, राणी म्हटली माझाच कारभार..
राजघराण्याची रीतच न्यारी ..
राणीला आली नातसुन, होती ती काळी
तिच्या रंगाची चर्चा मात्र जगात रंगली..
सुनबाईचं मन रमेना, बडेजाव काही रुचेना
होती मनांत पोकळी, राजवाडा सोडुन झाली मोकळी..
आली मोठी बातमी, सुनबाई होणारं आई
तिच्याबरोबर मीडिया पण डोहाळे देई..
राणीला झाला पणतू, मनांत होते किंतु परंतु
असेल का तो राजबिंडा की दिसेल सामन्य जनता?..
राजघराण्याची रीतच न्यारी ..
राणीचे नातलग, राणीपेक्षा त्यांनाच चिंता
शोधु लागले सातव्या वारसदारात भीन्नता..
पणतू थोडा बाप, थोडा आईवर
सुनबाई बोलू लागली वर्णभेदावर..
राणीला काही उमजेना, खिन्न होउंन एकांतात बसली
सुनबाई आणी नातू म्हटले , आम्हाला वाळीत टाकली ..
किती ती चर्चा, किती तो खटाटोप
राजघराण्यालासुद्धा नाही सुटत प्रसिद्धीचा लोभ..
राजघराण्याची रीतच न्यारी ..
हे तर सामान्यांच्या घरात रोजच घडतं
सासू सुनेतला वाद समजुन सोडुन दिल्या जातं..
कुणाचे डोळे, कुणाचे कान बघुन आनंद होतो
आपलाच भास समजुन मिरवलं जातं...
शेवटी काय?
तर
राजघराण्याची रीतच न्यारी ..
टिप : ही फक्त कविता म्हणुन वाचावी.. हे वर्णभेदावर भाष्य नाही .
- जयवंत