Wednesday 23 December 2020

माझी आजी! माझी ताई!

24 December 1990. आज तिला जाऊन ३० वर्ष झालीत(1 April 1911-24 December 1990). Mrs. Gokhale ह्याच नावाने ती educational field मध्ये ओळखली जायची. आमच्या साठी मात्र ‘ताई’.

आजी असुनसुद्धा ती आम्हा नातवंडांची ताई होती.

आधीची दुर्गा ढवळे आणि लग्नानंतर सुशीला गोखले. दोन्ही नावं तितकीच सार्थ ! प्रचंड दरारा, करारी, पण तितकीच प्रेमळ.


ज्या काळात मुली शाळेतसु्द्घा जात नसतं तेव्हा ही Pune Fergusson ची graduate आणि नंतर डबल-ग्रॅज्युएट. दरवर्षी शाळेत, कॅालेजमध्ये पहिली येणारी दुर्गा BA Honoursला दुसरी आली. शहीद भगतसिंगच्या फाशीमुळे प्रचंड चिडलेली आमची ताई परिक्षेत ब्रिटिश राजवटीविरुद्ध ताशेरे ओढून आली. ब्रिटिश प्रोफेसर्स तिला पहिला नंबर देऊ शकले नाही पण त्यांना तिची हिंमत पण हिराऊन घेतां आली नाही. तिच्यातली दु्र्गा शेवटपर्यंत कायम राहिली ती अशीच! सावरकर आणि टिळक तिचे दैवत.

बालविवाह ही प्रथा असताना ताई मात्र शिकत होती. वयाच्या 26 व्या वर्षी तिचे लग्न आमच्या नानांशी (Anant Ramachandra Gokhale) झाले आणि ती कायमची सेवासदनमयी झाली. एका छोट्या खोलीत सुरु झालेला नागपूर सेवासदनचा कायापालट एका व्यासपीठात रुपांतरीत करण्यात नानांइतकंच ताईचे पण कर्तुत्व अस्मानी होतं! नानांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहीलेली सुशिला.

बालविधवांसाठी शाळा आणि होस्टेल, गरीब मुलींना शिक्षणाबरोबर रोजगार, Montessori Training College ची स्थापना,इतकं सहजतेने करु शकणारी म्हणजे फक्त ताई. वंदनीय Principal Mrs. Gokhale.

संस्क्रीत पंडीत, English म्हणजे हातचा मळ, हिंदुधर्माविषयी प्रचंड आस्था आणि ज्ञानं पण प्रथेप्रमाणे १.५ दिवसाच्या गणपतीमुळे शाळेकडे दुर्लक्ष होते म्हणून घरी १० दिवसांचा गणपती, इतका सहज आणि सोपा निर्णय😊 आजही आमच्या घरी गणपती १० दिवस असतात.

वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा उत्साह आणि कणखरपणा कायम. मला आठवतयं, माझा मोठा भाऊ डॅा. उदयची surgery झाल्यावर, डॅाक्टर्सना नववार नेसलेली माझी आजी दिसली आणि म्हातारी समज़ुन ते तिला आधार द्यायला गेले.शांतपणे हीने  डॅाक्टरना सांगितले , “Dont try to confuse or pacify me, Tell me the diagnosis. I am more interested to know what you guys are doing about that”. डॅाक्टरने दंडवतचं घातलं 🙇‍♂️ 

मी स्कुटर शिकल्यावर double seat बसणारी ताई, ‘सिलसिला’ चित्रपट ३ वेळा बघणारी ताई,Science,Maths, Sanskrit, English, History, Geography चे आमचे doubts सोडवणारी आमची ताई किंवा ‘पुलाव स्पेशल’ ताई.

काळ पुढे जातो, आपण आपल्या आयुष्यात गुरफटून जातो,जुनी पीढी नसल्याची सवय करुन घेतो पण त्यांची उणीव मात्र आपल्याला कायम भासत राहते.

ताई जाऊन ३० वर्षे झाली पण आजही तिची आठवण येतांना मन उचंबळुन येतं. असती तर हवीच होती वा अजुनही हवी आहे पण नसली तरी तिचे आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत आणि आजही चुकलो तर धाक आणि प्रेम तितकंच आहे याची खात्री आहे.

We miss you Tai .. keep blessing us 🙇‍♂️ 

- Gokhales

Take a bow Japan for Tokyo Olympics and way forward for India

As the glittering ceremony of the Tokyo Olympics 2021 came to an emotional end, one can’t move ahead to Paris 2024 before bowing to Japan an...